२१ व्या शतकात आधुनिक
युगात जगत असतांना एक नजर मागे फिरवून बघितली तर आठरा विश्व दारिद्र दिसते समाज
कुठल्या दिशे कडे चालला आहे खर कळत नाही शिक्षण हे वाघिनीचे दुध आहे असे फक्त म्हणत
असतो पण प्रत्यक्षात खर मुले शिकत आहे का..?
संविधानाच्या ८६ व्या
घटने दुरस्ती नुसार Article २१-A नुसार
६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत हक्क मिळाला
पण आज बाहेर जर परिस्थीती बघितली तर किती तरी बाल मजूर कामगार दिसतील बाल कामगार
कायद्या नुसार १४ वर्षाच्या आतील मुलाला कामावर ठेवू
नये असे सक्त ताकीद असली तरी आज कित्येक ठिकाणी बाल मजुर दिसतीलच मग या मुलांची
शैक्षणिक जबाबदारी कोण घेईल सरकार तर म्हणत आहे मोफत व सक्तीचे शिक्षण मग
यामुलांना हे शिक्षण मिळते आहे का..? तर उत्तर नाही असेल मग
आपण कुठल्या दुनियेत राहतो जिथे कायदा असून शिक्षण नाही ज्या थोर समाज सुधारकांनी
शिक्षणा साठी आपले आयुष्य पणाला लावले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा
फुले आहिंसेचे तत्व देणारे माहात्मा गांधी आणि शिका, संघटित
व्हा व संर्घष करा यांची शिकवण देणारे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
समाजाला शिक्षणाची गोडी लावण्यासाठी लढा दिला अन्याय सहन केला आणि आज आपण फक्त
संतब्ध आहोत कारण आज जर परिस्थीती बघितली तर पुर्वी विट कामगारांच्या मुलांन साठी
विट भट्टीच्या जवळपास शाळा असायच्या साखर तोडणी कामगारांन साठी साखर शाळा होत्या
आणि खान कामगारांच्या मुलांन साठी पाषाण शाळा सारखे प्रकल्प होते आज महाराष्ट्रात
एवढ्या खाणी, साखर
कारखाने व विट भट्ट्या आहेत तेथील मुलांच्या शिक्षणाचे काय म्हणजे कामगाराच्या
मुलाने फक्त कामच कारावे की काय असे म्हटले तर किती योग्य असेल हे जर असे चालत
राहिले तर यामुळे विषमता कशी कमी होईल शिक्षण हा मानवाचा स्वातंत्र्य आणि विकासाचा
पाया आहे हे फक्त कला कौशल्याचा विकास करत नाही तर माणसाला पुर्ण स्वातंत्र्य व
प्रगतीच्या स्तरांवर सक्षम करते मग दगडखाणीतील कामगारांच्या शाळा बाह्य मुलांचे
काय सरकार कायदा करुन जबाबदारी झाली म्हणते मग या कामगार्यांच्या मुलांच्या
शिक्षणाची जबाबदारी कोणाची यासाठी काही नियोजन धोरण सध्या तरी दिसत नाही जे काही
काम चालू आहे यामुलांच्या शिक्षणासाठी ते पण फार कमी प्रमाणात सामाजिक संस्था पुढे
येऊन काम करत आहे.
मुले ही देवा घरची फुले आहे असे आपण म्हणतो पण मानत नाही कारण ती संवेदनशिलता आज दिसत नाही समाजातील प्रत्येक मुलांन मध्ये शिकण्याची कला व कौशल्य आवड आहे त्यांचे शिकण्याचे दिवस कशाला आंधारात ठेवतात त्यांना शिकवून मोठे होऊ द्या पुढे त्यांनच्या जगण्याला नवीन दिशा मिळेल..!
मयुर बागुल, अमळनेर
९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment