Thursday, November 15, 2018

आम्ही नेमकं कुठे चुकत आहोत.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त नाव ऐकले तरी अंगात दहा हत्ती एवढे बळ निर्माण होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात खुप मोठे योगदान तसेच या देशाला आर्पित केलेलं भारतीय संविधान ज्यामुळे हा देश एकसंघ, एकराष्ट्र म्हणून वाटचाल करत आहे. खरे तर यादेशाचे नशीब की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म भारतात व महाराष्ट्राच्या जन्मभूमीत झाला. बाबासाहेब जे काही घडले ते परिस्थिती मुळे, जीवनात प्रत्येकाला परिस्थिती ही शिकवत असते. हे सत्य आपण स्विकारले पाहिजे. बाबासाहेबांचे विचार यादेशातील खरे किती जनतेला समजले असतील हा जरा प्रश्न पडतो कारण जी शिकवण बाबसाहेबांनी दिली ती आपण कुठेतरी विसरत चललो आहे असे काही चित्र दिसत असते.

            थोडक्यात डॉ. बाबासाहेब यांनी तीन सूत्र सांगितली ती म्हणजे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा...!

आज देश कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे हे आपणास सगळ्यांना कल्पना असेलच गुलामगिरी करण्याची सवय ही भारतातील नागरिकांना मिळालेलं वरदान आहे असे वाटते आधी परकीयांची गुलामी केली आता सोकीयाची गुलामी करावी लागत आहे. ज्या गुलामगिरी मधून बहुजन वर्गाची सुटका व्हावी यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला आणि स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिले ते आपण विसरलो का ? आज या देशात सर्वात जास्त बहुजन समाज आहे तरी या देशाची सूत्र ही ब्राम्हण किंवा मराठा वर्गातील लोकांना कडे असताना आजवर अनुभवले आहे. आपण हा विचार कधी करणार आहोत की लोकसंख्येने सर्वात जास्त यादेशातील बहुजन समाज जास्त मात्र आजवर सत्ता ही कशी मिळू शकली नाही. मला सत्ता मिळवणे म्हणजे हुकुमशाही करणे असे नाही म्हणायचे तर ज्या बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधाना नुसार देश चालवण्यासाठी नेतृत्व बहुजन वर्ग का कमी पडतो. आज बाबासाहेबांचे संविधान बहुजन जनतेला खरच माहिती आहे का ? भारतीय संविधान काय आहे ? आपले मुलभूत हक्क व कर्तव्य या देशातील नागरिकांना काय दिली आहे. मला हेच समजून सांगायचे आपण आजून शिक्षित झालो नाही कारण आपल्याला संविधान काय हेच आपण समजून घेत नाही आहोत ज्यांना समजले ते इतरांना समजून सांगत नाही कारण दुसर कोणीतरी आपल्या पुढे निघून जाईल किंवा मोठा होईल ही भिती बहुजन समाजातील काही तथाकथित स्वयंभू राजकीय मोठ्या पक्षाची गुलामगिरी करणाऱ्या नागरिकांना असते. खरे तर आपण सर्व बहुजन समाज बाबासाहेबांनी सुरु केलेल्या पक्षात एकजुटीने राहिले पाहिजे पण तसे होत नाही प्रत्येकाला नेते होणायची स्वप्न पडू लागले आणि खरी चळवळ व पक्ष दुभंगले गेले. खरी शोकांतिका म्हणजे बहुजन समाजात एकजूट नसल्याची हेच उदाहरण जर ब्राम्हण समाजातील बघितले तर सर्व राष्टीय स्वयंसेवक संघाच्या छत्र छाया खाली काम करतांना दिसतात मग भाजप सारख्या राष्ट्रीय पक्ष देशाचे नेतृत्ब करण्यास तयार होतो आणि आम्ही बहुजन समाज यांची गुलामगिरी करतो असे काही आपल्या समाजात दिसून येते. माझा मुद्दा नेमका हाच की आपण आपली वाट चुकीच्या दिशेने टाकली आहे ती वेळीच सुधारली पाहिजे नाहीतर आपल्याला गुलामगिरीचे जगणे पुन्हा जगावे लागेल. यासाठी आपण काय करू शकतो हे माझ्या मते पुढील प्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा

१.       शिका – बाबसाहेब यांचे शिक्षण किती झाले हे माझ्या माहिती प्रमाणे बहुजन वर्गातील सर्व जनतेला माहिती असावे. त्यामानाने आपण किती शिक्षण घेत आहोत हे बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने बघितले पाहिजे. मी म्हणत नाही की आपण बाबासाहेब झालो पाहिजे पण बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपण शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. आपण असे म्हणाल की शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती नाही मग बाबासाहेब यांची परिस्थिती तरी कुठे होती एवढे शिक्षण घेण्याची तरी ते येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती समोर लढा देऊन शिकले कारण नाही पुढे केले. परिस्थिती वर विजय मिळवून शिक्षण घेतले आज देखील बहुजन समाजातील तरुण पिढी शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करत आहे परिस्थितीवर विजय मिळवत आहे पण त्यांचे प्रमाण फार थोडे कमी दिसते हे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आपल्या समाजातील प्रत्येक तरुण उच्चशिक्षित कसा होईल सरकारी भरपूर योजना व अनुदान आहे हे आपण आपल्या समजतील पिढीला मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे आपला उद्धार आपल्यालाच करावा लागणार आहे मतभेद विसरून बहुजन समाज व बाबसाहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर दिवस रात्र असला पाहिजे पण तसे राहत नाही आजही मुख्य शहरात बघितले तर आपला समाज हा झोपडपट्टी मध्ये राहत आहे. चांगले जीवन जगणे आपल्याला आवडत नाही का? मग का बरे आजून आपण झोपडपट्टी जीवन जगत आहोत ज्यांचे कल्याण झाले त्यांनी इतरांचे करावे समाज एकमेकांच्या सहकार्याने पुढे जातो. बाबासाहेब यांनी जर फक्त स्वता पुरता विचार केला असता तर आज आपल्याला जेवढे स्वतंत्र मिळाले आहे कदाचित ते मिळाले नसते. आज अनेक झोपडपट्टी च्या जवळ दारू विक्री च्या दुकानावर तसेच पत्ते खेळणारे लोक ही आपल्या बहुजन समजतील दिसतात मला इतर समाजाबद्दल बोलत नाही, पण हे जे झोपडपट्टी बाहेर प्रकार होतांना दिसतात त्यांच्या मुलांनवर काय परिणाम होतो ह्याचं विचार हा सर्वांनी मिळून केला पाहिजे माझी सुधारले म्हणून विसरून चालणार नाही तर समाज म्हणून आपण प्रत्येकाचा उद्धार केला पाहिजे. तर कुठे आपण इतर समाजाच्या बरोबरीने पुढे दिसू आणि आपले प्रत्येक समाज बांधवांच्या आयुष्याचे कल्याण होईल. बाबसाहेब यांनी शिका म्हटले पण आपण नेमकं काय शिकत आहोत हे बहुजन समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

२.       संघटीत व्हा – खरे तर खूप महत्त्वाचे सांगून गेले पण आपण याचं गोष्टींचा विसर प्रत्येकाला पडला दिसतो. आपण उत्सव कश्या पद्धतीने एकत्र येऊन साजरे करत असतो पण ते साजरे करण्याचे मध्यम चुकीचे ज्यावेळी आपण दुसऱ्यांना चुकीचे ठरवतो तेव्हा ती चूक आपल्या हातून देखील घडत असते माझ्या दृष्टीने आज बाबसाहेब आज असते तर त्यांना काय वाटले असते त्यांना अपेक्षित असल्या प्रमाणे आपण खरच उत्सव साजरा करतो का? बाबासाहेब यांचे नाव घेऊन आपल्यातीलच काही राजकीय पुढारी हे राजकारणात आपला वापर करून घेत असतात आणि स्वताचे कल्याण करतात नाचून व डी. जे. लावून संघटीत होणार आहे का? आपल्या डोळ्या समोर ब्राम्हण समाजचे उदाहरण आहे आपण त्यांच्या पासून काही शिकणार आहोत की नाही त्यांना शिव्या देऊन आपले कल्याण होणार नाही आपल्याला देखील संघटीत होण्यासाठी त्यांचे सारखे बहुजन समाजातील मुलांना साठी वर्ग सुरु करावे लागतील. बहुजन समाजातील प्रत्येक नागरिकाला आपले कायदे माहिती असणे गरजेचे विशेषता बहुजन समाजातील नागरिकान साठी असलेले कायदे बद्दल माहिती ही समाजातील प्रत्येक नागरिकांना आपण समजून सांगितले पाहिजे. बाबासाहेब यांना शोभेल असे कार्य आपल्या प्रत्येकाकडून घडले पाहिजे पण स्वार्थी राजकीय लोक आपला प्रत्येक वेळी त्यांच्या फायद्यासाठी वापर करून घेत असतात. आज प्रत्येक वस्ती पातळीवर समाजकेंद्र उभारली आहे त्यामध्ये आपण आपली पुढची पिढीला कायद्याविषयी शिक्षण दिले पाहिजे. नागपूर येथे जमा होणारी गर्दी आणि दादर येथे जमा होणारा समूह ही आपली खरी संघटीत ताकद आहे पण त्यामध्ये मात्र एकच समाजाची मंडळी हि वेगवेगळ्या पक्षाचा हातात झेंडा घेऊन आहे. मला असे वाटते ज्या बाबासाहेबांनी समाजाला संघटीत होण्यासाठी राजकीय पक्ष काढला त्यापक्षाच्या छताखाली एकत्र येण्याचे सोडून आपण आपले संघटन दुभागून टाकले आहे. कदाचित त्यामुळे आपण आजूनही गुलामगिरी करतच आहोत आपण सर्वांनी हि गुलामगिरी सोडून बाबासाहेबांच्या विचार काम केले पाहिजे उत्सव साजरे करताना बाबासाहेब व त्यांच्या कार्याला शोभेले असे आपण संघटीत होऊन समजात परिवर्तनासाठी उत्सवाच्या माध्यामतून कार्य केले पाहिजे. संघटीत व्हा हे कश्यासाठी सांगितले हे आजूनही आपल्याला नीट समजले नाही व्यक्तीपूजेला विरोध करून त्यांना आपण सर्वजण एक आहोत मात्र आज आपण त्यांची पूजा करतो मला कळत नाही की आपण बाब्साहेबना मानतो पण त्यांची पूजा व मिरवणूक काढून कुठला आदर्श समाजापुढे दाखवतो. मला कोणाला विरोध करायचा नाही पण आपल्याला पुढे जायचे असेलतर आपण दुसऱ्याचे अनुकरण करतांना हे लक्षात ठेवले पाहिजे की बाबसाहेब यांनी आपल्याला ज्या न्याय व हक्कांसाठी लढा देण्यास सांगितले त्यासाठी आपण आपला वेळ व पैसा खर्च केला पाहिजे.

३.       संघर्ष – संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. जो बाबसाहेब यांच्या आयुष्यात देखील होता पण त्यांनी कधी त्यामधून पळवाट नाही काढला उलट त्यांनी त्या संघर्षाचा सामना केला आणि आज प्रत्येक देश त्यांचा आदर्श पाळतो. आज २१ व्या शतकात बहुजन समाजाला संघर्ष करावा लागतच आहे तो इतरांन सोबत आहेच पण एकमेकां सोबत देखील आहे. आपण संघर्ष केला पाहिजे पण तो आपल्या हक्कांसाठी व सुख सुविधा, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय या क्षेत्रात आपण संघर्ष करून मोठ्याप्रमाणात इतरान समोर आदर्श ठेवला पाहिजे. बहुजन समाजातील जनतेच्या हितासाठी आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष करून न्याय मिळवला तर आपल्या समाजातील नागरिक वंचित राहणार नाही. आज आपल्या समाजातील लोकांना वंचित घटक म्हणून ओळखले जाते पण ही ओळख आपल्याला मिटवली पाहिजे वंचित म्हणून किती दिवस आपण जीवन जगणार आहोत यांचा विचार बहुजन समाजातील प्रत्येक नागरिकांनी केला तर आपल्याला जास्त संघर्ष करावा लागणार नाही. आपल्यातीलच लोक आपल्याला पुढे येऊ देत नाही हे मान्य केले पाहिजे. आज बहुजन समाजात अनेक जाती व पोट जाती आहे पण अजूनही काही पोटजातीतील लोकांना रोजच्या दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हा विचार बहुजन समाजातील नागरिकांना येत नसेल का? तेच जर मराठा समजतील लोकांचे बघितले तर आज ते एकमेकांना सहकार्य करून संघर्ष करून प्रत्येकाला पुढे आणून सत्तेत मोठे करतात. त्यांच्या उलट आपल्या बहुजन समाजात आहे. पुढे जाणारा फक्त स्वताचा विचार करतो आणि आपल्या मागील लोकांना तो कधीच पुढे घेऊन जात नाही कदाचित म्हणूनच बाबसाहेब यांनी सुरु केलेल्या राजकीय पक्षात आजूनही बहुजन समजाचा विश्वास बसत नाही. संघर्ष करावा तो इतरांच्या पुढे जाण्यासाठी बहुजन समाजातील लोकांना मागे पाडण्यासाठी नाही. आपल्याला मिळणाऱ्या योजनेचा फायदा आपल्या बहुजन समाजातील प्रत्येक नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी काम केले पाहिजे पण ते मिळून देण्यासाठी फसवणूक होतांना आपल्या समाजातील लोक करतांना दिसतील अश्या लोकांचे काय केले पाहिजे ह्यावर विचार होणे गरजेचे आहे.

हा लेख लिहित असतांना मला इतरांचा चांगले आपले वाईट असे सांगायचे नाही किंवा कोणाला विरोध व मन दुखवण्याचा हेतू नाही. पण जे आपल्या पेक्षा चांगले ते आपण स्वीकारले पाहिजे. डॉ. बाबसाहेब यांचे कार्य व विचार हे समजून घेऊन आपण त्यांना शोभेल असे कार्य करून आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकांना पुढे आणून बरोबरीने काम केले तर आपण देखील वंचित राहाणार नाही. बाबांनी जी शिकवण दिली ती समजून घेतली तर आपण नक्कीच या देशावर सत्ता मिळवू शकू पण त्यासाठी आपल्याला मतभेद विसरून बाबसाहेब यांचे कार्यकर्ते म्हणून एक येऊन लढा दिला तर आपला कोणीही वापर करू शकणार नाही.

मयूर बा. बागुल

पुणे – ९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment