मराठी भाषा ही जगात सर्वात
जास्त बोलली जाणारी भाषा आहे सगळ्यांचे प्रेम आणि आदर आपल्या मराठी भाषेबद्दल दिसून
येतो. मराठी वाचक कमी होत आहे आणि त्याचं प्रमाणे मराठी शाळा बंद पडण्याचा विडा उचलून
हिंदी व इंग्रजीचे अतिक्रमण हळूहळू मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. आज मात्र समाजात
मोठ्या
प्रमाणात युवा वर्ग लिहितांना व वाचतांना दिसून येते त्याचा प्रमाणे ज्यांना स्वताच्या
मातृभाषा बद्दल आदर वाटतो ती भाषा टिकावी म्हणून आपल्या परीने योगदान देत आहे. मराठीत
एक म्हणीचा उपयोग केला जातो ‘मोडेन पण वाकणार नाही” पण
“नजर फिरवेल आणि वाचून काढेल” असे काहीसे चित्र आज पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे दिसते. त्याचप्रमाणे प्रकाशक विचार करू लागला की वाचकांना कुठल्या प्रकारचे
साहित्य वाचण्यात आवड आहे. पुढच्या पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रकाशक
मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित करतांना दिसू लागले. माझा अनुभव असा की
एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात
वाचण्यापेक्षा त्याची प्रत विकत घेऊन अधिक वाचण्यात मज्जा वेगळीच
असते. आज मराठी भाषे बद्दल वाचन संस्कृती वाढली पाहिजे कारण मराठी ही मातृभाषा असली तरी इंग्रजी ही ज्ञानभाषा त्यामुळे एखाद्या भाषेबद्दल मनात भीती निर्माण
होऊ देऊ नये इंग्रजी बोलता येत नाही ही भीती असल्यामुळे आपल्या मुलांना किमान चांगले
इंग्रजी बोलता यावे यासाठी इंग्रजी शाळेत प्रवेश घेऊन आपण मराठी भाषेचा वाचन आपल्या
मुलांना वर रुजवले पाहिजे. मराठी वाचक पहिल्या सारखा राहिला नाही असे
बरेच बुद्धिवान, तत्वज्ञानी मांडळी ओरड करत असतात परंतु त्यांना देखील कळले पाहिजे
की वाचक तयार करण्यासाठी वाचकांना दर्जेदार साहित्य समोर मांडावे लागतील तसेच असे बोलणाऱ्यानी
बोलून बाजूला जाण्यापेक्षा त्यासाठी योगदान दिले पाहिजे. आज महाराष्ट्रातील युवा पिढी
मध्ये वाचनाची गोडी वाढत आहे त्यामुळे त्यांची कदाचित लेखणी देखील धारदार होऊ लागलेली
दिसते. एखाद्या प्रश्नावर मत मांडत असतांना अभ्यास पूर्वक मत मांडण्याची क्षमता तयार
होतांना दिसते यावर नजर टाकली तर लक्षात येते की हे सर्व कुठेन आले तर त्यामागे वाचन
आहे. एखाद्या विषयाची मांडणी करत असतांना
त्यांच्या त्याबद्दल असलेले वाचन आपण बघितले पाहिजे.
आज एकीकडं माध्यमांच्याशिवाय आपलं पान हलत नाही तर दुसरीकडे त्यांच्यापासून सुटका हवी असंही वाटते. यावर आपण विचार केला तर हे सर्व नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला मुलांना समजून
घेऊन त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे भाषा शिकून साक्षर व्हायला हवं आणि त्यासाठी आपण काय वाचतो किंवा
पाहतो किंवा ऐकतो ते डोळसपणे समजून पालकांनी घ्याला हवं. आपण बघितली पाहिजे आपण आपल्या मुलांना समाज माध्यमाचा वापर
किती करू दिला पाहिजे हे देखील समजून घेतले पाहिजे. एकीकडे हे सर्व घडत असतांना आपण प्रकाशक
वर्ग वय वर्ष १० ते १६ गटातील मुलांना मध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी काय कार्यक्रम
नियोजन करतो किंवा त्यांना नवीन नवीन साहित्यांची ओळख होण्यासाठी कुठले उपक्रम आपण
प्रकाशक म्हणून करतो हे बघितले पाहिजे भविष्यातील पिढी मध्ये वाचन संस्कृती ही रुजवावी
लागेल आणि त्यासाठी प्रयत्न देखील होतांना दिसतात.
जन्मापासून आपल्याला आजूबाजूच्या वातावरणातून अनेक प्रकारचे संदेश मिळत
असतात. त्यातून आपण शिकत जातो. पण प्रत्येक वयात मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून
ती आत्मसात करण्याची मेंदूची क्षमता वेगळी
असते. अपरिपक्व मेंदूवर नको ती माहिती आदळत राहिली तर त्याचे दुष्परिणाम होतात त्याला
वास्तव आणि काल्पनिक जग यातला फरक समजत नाही. तसेच काही वाचण्याच्या बाबतीत दिसते वाचन
वाढते आहे पण नेमकं काय वाचतो किंवा कुठल्या प्रकारचे साहित्य प्रकार वाचत आहे हे ओळखता
आले पाहिजे.
ज्यावेळी मराठी भाषा
व संस्कृती वर बोलतो त्यावेळी आपण तपासले पाहिजे की माझ्या घरात मुलांना वाचण्यासाठी
कुठल्या प्रकारचे पुस्तक उपलब्ध आहे. आज समाजात आधुनिकीकरण होत असतांना तंत्रज्ञानाचा
वापर काही प्रमाणात चांगला होतांना दिसतो “ऑनलाईन वाचन कट्टे” राबविले जात आहे. बाल मुलांचा समूह तयार करून त्यांचे ध्वनीमुद्रण करून
ते पुन्हा त्यांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले जाऊ लागले. त्यामुळे मराठी वाचक कमी
होत आहे असे समाजात चित्र निर्माण करणारे यांनी जरा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी योगदान
देण्याचे परिश्रम घेतले तर बरे होईल. मराठी भाषा दिवस साजरा करत असतांना तो मात्र एका
दिवसासाठी साजरा करून होणार नाही हे देखील आपण बघितले पाहिजे कारण भाषेला दिवस नसतो
ती टिकवण्यासाठी तेथील समाजाने आपल्या भाषे बद्दल निष्टावंत राहून वाचन
संस्कृती हा आपला कणा आहे तो आपण मोडणार नाही हे आपल्या मनात रुजवले पाहिजे. वाचनाची
आवड ही निर्माण केली जात नाही तर ती निर्माण करावी लागते त्यामुळे आज आपण बघितले तर
अनेक प्रकाशक हे पुस्तके घरपोच देण्याची देखील सुविधा देतांना दिसतात. समाजातील युवा
वर्ग हा तंत्रज्ञान वापरत असतांना मोबाईल वर मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतांना दिसतात
त्याच प्रमाणे आपले विचार इतरांन पर्यंत पोहचण्यासाठी मराठी मधून ब्लॉग लिहितांना आपल्याला
सध्याची युवा पिढी दिसते हे आपण विसरून चालणार नाही. मराठी वाचक कमी होत ही खोटी अफवा
पसरून मराठी भाषेबद्दल द्वेष निर्माण करणारे हे मुळात मराठी भाषिक नसतील असे माझे तरी
मत आहे. पुणे हे विद्याचे माहेर घर असणाऱ्या शहरात शाळेतील मुलांना वाचनाची आवड निर्माण
होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद उत्तम उपक्रम राबविताना दिसते तो म्हणजे “लेखक
विद्यार्थंच्या भेटीला” सुंदर संकल्पना ही पुण्यामध्ये राबविली जाते तसेच महाराष्ट्रातील
इतर देखील शहरांमध्ये लेखकांनी पुढाकार घेऊन भविष्यातील पिढी समोर गेले पाहिजे. त्यांना
साहित्य प्रकार समजवण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील मराठी साहित्यिकांनी केला
पाहिजे तसेच साहित्य तयार कसे होते हे मुळात आपल्याकडे कधी कोणी समजवून सांगितलेच
नाही त्यामुळे कदाचित साहित्य्कांचा मुलगा हा साहित्यिक होऊ शकला नाही.
मराठी भाषे मध्ये
दर्जेदार साहित्य आहे जे इतर कुठल्या भाषे मध्ये जास्त दिसत नाही. इंग्रजी भाषेचे पुस्तक
अनुवाद करून मराठीत प्रकाशित होऊ शकते पण तेच मराठी भाषेतील पुस्तक इंग्रजी भाषेत देखील
अनुवाद करून प्रकाशित झाली पाहिजे परंतु हे प्रमाण फार थोडे आहे. मराठी भाषा ही सात
समुद्रापार आहे ह्या भाषेतील साहित्य देखील सात समुद्रापार पोहचवण्याची जबाबदारी उचली
पाहिजे. पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे हे आपण विसरून नाही चालणार
त्यामुळे वाचन कट्टे हे फक्त मोठ मोठ्या शहरात राबवून चलणार नाही तर महाराष्ट्रातील
ग्रामीण भागात देखील राबविले गेले पाहिजे. ज्यामुळे भविष्यातील पिढी मध्ये खऱ्या अर्थाने
चांगल्या विचारांचे बीज पेरले जाईल आणि म्हणूनच म्हणावे लागते की वाचकांचा कणा कधी मोडत नसतो तो नेहमी आपल्या विचारांची प्रगल्भता
वाढविण्यासाठी सदैव तत्पर असतो.
मयूर बा. बागुल
मो – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment