आम्ही सारे भारतीय
म्हणजे नेमके खरच भारतीय म्हणून गणराज्य संघ व्यवस्थेत १९५० पासून संविधानिक
अधिकार मिळाला समता, स्वतंत्र्य, बंधुता, न्याय आज मागे वळून बघितले तर खर हे सगळे
बदलेले दिसते का? मिडिया प्रत्येक वेळी विविध राजकीय पुढाऱ्यांचे लेखा जोखा मांडते
आणि विरोध करणारे विरोध करतील आणि सत्ताधारी आपल्या कामाचे मार्केटींग करतील या सर्वान
मध्ये सर्व सामान्य जनता कुठल्या दुखात जगते आहे यांचा लेखा जोखा तीव्र स्वरुपात कधी
मांडणार हा प्रश्न प्रत्येक वेळी पडत आसतो यासाठी तर संसद कायदे मंडळ असते. पण
कालांतराने तिचा देखील काही वेळा अपमान होतांना दिसतो सर्व सामान्य जनतेने लोकहिता
साठी या पवित्र सभागृहात पाठवले प्रतिनिधी निवडून पाठवले असते पण जर तिथे बघितले
तर प्रतिनिधीची उपस्थिती किती असते. बेताल वक्तव्य उपदेश देणे असले काम करून त्या
संसदेचे कुठले पवित्र राखतात. आज तळागळातील माणूस जीवन सुधारण्यासाठी जगतो पण
समाजातील निकृष्ठ व घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक स्वताच्या स्वार्थ साठी वाटेल ते
करतात पण याला तरी आपण काय करणार प्रत्येकाल कळते पण जे घडते त्याच्या मागची पार्श्वभूमी
समजून घेणे गरजेचे आहे सगळी कडे जसे वाटेल तसे चालू द्या बघू हा “आपला माणूस” ही
प्रत्येकाची नीतीमत्त झाली आहे. कामातील प्रामाणिक पणा लोप पावताना दिसतो उदासीनता
वाढत आहे.
खरे की या देशातील चौथा स्तंभ मिडिया याने तरी समाजा
पुढे आदर्श ठेवावा पण आज यावरचा देखील जनतेचा हळूहळू विश्वास ठेवणे कमी होताना
दिसते काय दाखवावे किंवा काय दाखवू नये याचे काही तारतम्य राहिले नाही पण या
बाबतीत सरकारी मिडिया आपला आदर्श नेहमी बाळगून असतात. सरकार आणि समाज म्हणजे काय
समाजातूनच तर सरकार तयार होते. जे प्रतिनिधी निवडले जातात ते समाजातूनच तर निवडले
जातात तर मग सरकार दुसरे तिसरे काही नसून समाजातील सर्व नागरिकच सरकार आहे फरक
एवढा आहे कि लोकशाही बाळगुन व नैतिकता, मूल्य, तत्व बाजूला ठेऊन निवडून येतात सर्व
तसेच नसतात पण प्रमाण बघितले तर नक्कीच जास्त दिसेल मग आपण बघतो तेच तेच चेहरे
आमदार, खासदार म्हणून ५ वर्ष मी तर ५ वर्ष तू हे च मग कुठली लोकशाही म्हणावी आपण एवढेच
काय तर सरकारी संस्था देखील यांच्या असतात प्रत्येक पक्ष खिच्यात घेऊन फिरतात इकडे
नाही मिळाले तिकडे मिळेल तिकीट आपण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी
बघितले असेलच वेगळे काही नाही मरतो तो फक्त दिन दुबळा सर्व सामान्य माणूस यासाठीचा
कधी मिडिया लेखा जोखा सर्व सामान्य जनतेचा माडते का? जरी मांडला तरी पुढे त्याचा
पाठपुरावा कोण करणार प्रश्न येथे येऊन थांबतो.
जर आज प्रत्येक नागरिक जबाबदार जागृत राहून जगू
लागला तर कशाला कोणाची हिम्मत होईल जिथे चुकत आहे तिथे ती चूक दाखवलीच पहिजे आन्याय
सहन न करून घेता ताकदीने कधी सर्व लढणार आहे का एकटा लढलो तर दाभोलकर, पानसरे
सारखा गळा घोटला जातो पण हे लक्षात नाही येत या समाजकंटक लोकांना विचार कधी घोटला
नाही जात तर विचार आजून खंबीर प्रमाणात समाजात पेरली जातात. आज भारत युवकांचा देश
म्हणून आपले प्रांतप्रधान मोदी जी मोठ्या आभिमानाने सांगतात अश्या वेळी विचार येतो
मग या सरकार मध्ये किती टक्के प्रतिनिधी आज युवक आहे कि ज्यांच्या कडे कौशल्य
नेतृत्वाचे प्रमाण कमी हा प्रश्न पडतो तर मग ऐकी कडे जर बघितले तर वारस परंपरा
पिढी पुढे आलेली दिसून येते जणू यांची मक्तेदारी चालू आहे. दुसऱ्याने कधी मोठे
होऊच नये सर्वच युवक नाही जाऊ शकत पण हि संधी उपलब्ध असून समाजतील प्रतिष्टीत लोक
आपल्या आर्थिक तिजोरीतून क्षणिक सुख आश्वासने, पार्टी देऊन आपले स्थान निर्माण
करतात मग अश्या वेळी मिडिया लेखा जोखा का मांडत नाही. आज समाजातील प्रत्येक सर्व
सामान्य जनता पैसे घेऊन मतदान करते हे सत्य कोणी लपवून ठेऊ शकत नाही किती जरी आपण
यावर जन जागृती केली तरी पण या सर्व प्रकारल जबाबदार कोणाला ठरवता येईल सामन्या
जनतेचा रोष दिसतो ती कंटाळलेली असते कारण तिला वाटते कि आज पैसे घेऊन निदान २ ते ४
दिवस तरी उदर निर्वाह करू शकेल कारण गेली ६० वर्षा पासून प्रामाणिक पणाचा फायदा
घेतला गेला एवढ्या वेळी निवडून दिले त्यांना पण जनतेचा विकास सोडून स्वताचा विकास
दिसतो. उदा. शाळा, कॉलेज, दवाखाने, मंदिर, कारखाने, बँक इ. मग सांगा विकासाची गंगा
कोण कडे गेली सर्व सामान्य जनते कडे की प्रतिनिधी कडे आपण म्हणतो कायदे न्याय आहे
पण प्रत्येक कायदा मधून पळवाट कडू लागले कायदे सर्व सामान्य जनतेला न्याय देणारे नाही
असे जर असते तर मग समाजातील दलित अत्याचार पिडीत कुटुंबाला न्याय का मिळत नाही. समाजातील
नागरीकाला काय पाहिजे आहे याच्या कधी विचार केला जातो कि नाही कुठली हि योजना आली
कि पहिले त्यात भागीदारी ठरलेली असते खालून तर वर पर्यत हिशोब ठरलेले असतात मग काय
उदा. १००० ऐवजी १०० दिसतात हे प्रकार घडलेले आहे.
यावर मी एकच म्हणेल प्रत्येक स्तरातील नागरिकाने
जे मिळते आहे त्यात सुखी व समाधन मानावे प्रामाणिक पणा ठेऊन निष्ठेने काम करा नुसते महान
थोर पुरुषांचा आदर्श फोटो लावून किंवा जय जयकार करून प्रेम बाळगू नका तर त्याच्या मुल्यातून
व तत्वातून ज्ञान घेण्यास शिकावे आज जर नाही सुधारलो तर उद्याचा समाज कधीच माफ
करणार नाही.
शेवटी जगा आणि जगू द्या....!
मयूर बागुल, अमळनेर
मो. ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment