अलाहाबाद
मध्ये काल जे काही झाले ते नक्कीच दुर्दैवी आहे. यात कोणाची चूक आहे हे शोधण्याचे
काम सरकारी पातळीवर होईलच, मात्र
ही जी घटना घडली ती पाहता कुंभमेळ्या सारख्या सोहळ्यांची खरंच गरज आहे का? असा प्रश्न पडतो. आपल्या धार्मिक
श्रद्धा गर्दीला आमंत्रण देतात. अनेकदा माणसातला माणूस मारतात. महाराष्ट्रातील
मांढरदेवीच्या घटनेतूनही आपण हा अनुभव घेतला आहे. हे होऊ नये म्हणून सरकारने काही
करावे याची वाट पाहण्यापेक्षा आम्ही स्वतःच काही वेगळा विचार करायला काय हरकत आहे?
काही दिवसांपूर्वीच ‘ओ माय गॉड’
नावाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने अगदी सुंदर विषयाला
हात घातला आहे. आपल्यालाही या चित्रपटातील कांजीलालप्रमाणे विचार करण्यास नक्कीच
शिकले पाहिजे. सर्वांनी सरसकट नास्तिक व्हावे असं मला म्हणायचं नाही. फक्त
देवाच्या नावाखाली लोकांनी आपल्या तिजो-या भरण्याचा धंदा कसा सुरू केला आहे याकडे
किमान एकदा तरी डोळसपणे पाहायला हवे.
याच आशयाच्या मराठीत येऊन गेलेल्या
‘देऊळ’ चित्रपटातील गावक-यांनी घेतलेली दत्ताची फ्रेंचायझी सर्वांच्याच लक्षात
असेल. रोज देवळांमध्ये किती तरी फुले वाया जातात. शिर्डीत मोठ्या आस्थेने घेऊन
गेलेले गुलाबाचे फुल बाबांच्या पायालाही न लागता दरवाजाशी असलेल्या निर्माल्याच्या
टाकीत जाते आणि तेही आपल्या डोळ्यासमोरच! ते पाहून एका कवीने म्हटलेल्या पुढील चार
ओळी आठवतात,
मंदिर में फुल चढाने गये तो ये एहसास हुआ,
की पत्थरो को खूश करने के लिये फुल का कत्ल कर आये हम…!
मिटाने गये थे पाप जहा, उधर एक और पाप कर आये हम…!
काही दिवसांपूर्वीच शिर्डीतील साईबाबांच्या चरणी वर्षभरात २७५ कोटीचे दान आल्याची बातमी वाचली. ज्या साईबाबांनी साध्या पालखीतून मिरवणुकीला नकार दिला होता, त्याच साईबाबांच्या नावाखाली आज साई संस्थानाच्या तिजोरीत करोडोचा पाऊस पडावा, याला काय म्हणावे? साईबाबांनी स्वत: कधी ऐशारामाचे जीवन न जगता भिक्षा मागून लोकांच्या भल्यासाठी काम केले. त्याच साईबाबांच्या मूर्तीला आज करोडोच्या सिंहासनावर बसवले जावे. जन्मभर स्वच्छतेविषयी जागृत राहिलेल्या बाबांच्या पालखीच्या स्थळी भक्तांनी केलेला प्लॅस्टिक प्लेट्सचा, ग्लासचा कचरा आणि अस्वच्छता बाबांना खरच पटेल का?
की पत्थरो को खूश करने के लिये फुल का कत्ल कर आये हम…!
मिटाने गये थे पाप जहा, उधर एक और पाप कर आये हम…!
काही दिवसांपूर्वीच शिर्डीतील साईबाबांच्या चरणी वर्षभरात २७५ कोटीचे दान आल्याची बातमी वाचली. ज्या साईबाबांनी साध्या पालखीतून मिरवणुकीला नकार दिला होता, त्याच साईबाबांच्या नावाखाली आज साई संस्थानाच्या तिजोरीत करोडोचा पाऊस पडावा, याला काय म्हणावे? साईबाबांनी स्वत: कधी ऐशारामाचे जीवन न जगता भिक्षा मागून लोकांच्या भल्यासाठी काम केले. त्याच साईबाबांच्या मूर्तीला आज करोडोच्या सिंहासनावर बसवले जावे. जन्मभर स्वच्छतेविषयी जागृत राहिलेल्या बाबांच्या पालखीच्या स्थळी भक्तांनी केलेला प्लॅस्टिक प्लेट्सचा, ग्लासचा कचरा आणि अस्वच्छता बाबांना खरच पटेल का?
एकीकडे हजारो रुपयांचा खर्च करून
मंदिराबाहेर दुकाने लावून बसलेल्या भुरट्यांनी घातलेल्या भीतीला बळी पडून देवाचे
दर्शन घ्यायचे आणि दुसरीकडे घरी जुने कपडे किंवा दान मागण्यासाठी आलेल्या समाजसेवी
संस्थेच्या कार्यकर्त्यांना थातूरमातूर कारणे देऊन पिटाळून लावायचे हीच
(दुर्)बुद्धी मागण्यासाठी देवाचा आशीर्वाद मागितलेला असतो का? तासन् तास लावलेल्या रांगामध्ये
रडणारी पोरे, थकल्या-भागल्या
म्हाताऱ्या माणसांना आपल्या जीवाचे इतके हाल करून, रांगेत उभे राहून दर्शन घेऊन काय मिळते, हा विचार करायला लावणारा प्रश्न
आहे. आपल्या भक्ताला इतके कष्ट करून आपल्या दर्शनाला येताना पाहून देवाला खरंच
आनंद होत असेल का?
मारुतीच्या देवळाबाहेर दर शनिवारी
तेल वाहण्यासाठी अनेक जण तेलाच्या लहान पिशव्या विकत घेतात आणि मारुतीला इच्छा असो
वा नसो,
त्याला त्या तेलाची अंघोळ
घातली जाते. पापड तळताना थोडे जरी तेल जास्त झाले तर जीवाचा तीळपापड होतो मग
आरोग्याचा आदर्श असलेल्या मारुतीला हे तेल कसे ‘पचत’ असेल याचा आपण कधी विचार केला
आहे का?
शंकराच्या पिंडीवर वाहण्यात
येणा-या दुधामुळे अनेकदा महाशिवरात्रीला मंदिराच्या गाभा-यात दुधाचा असा काही उग्र
वास पसरलेला असतो की आपल्याला क्षणभर प्रश्न पडतो डेअरीत आलो आहोत की मंदिरात.
ज्या उग्र वासात आपल्याला उभे राहणे मुश्किल असते त्या वातावरणात देवाला कसे
प्रसन्न वाटणार?
हिंदू संस्कृतीतील अनेक
प्रथा-परंपरांना काही वैज्ञानिक आधार आहे. उदाहरणार्थ, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करण्याची प्रथा आहे.
कारण या वृक्षामुळे हवा स्वच्छ राहण्यास मदत होते. वृक्षसंवर्धन हा पूजेमागचा हेतू
आहे. मात्र, मूळ
हेतूला बगल देत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या फास्ट लाइफमध्ये स्त्रिया
तोडलेल्या वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पुजा करतात.
नास्तिक (न+ अस्तिक) म्हणजेच ज्याचा
देवावर विश्वास नाही असा किंवा जो प्रत्येक गोष्टीचे लॉजिकल कारण मागतो असा. मात्र, सर्व गोष्टींमध्ये देव आहे असे धर्म
ग्रंथच सांगतात. त्यामुळे नास्तिक लोकांनाही नास्तिक म्हणण्यात काहीच अर्थ नाही
कारण ते लोक शास्त्रात सिद्ध झालेल्या अनेक गोष्टींना मानतात. आस्तिक आणि नास्तिक
या वादात पडण्यापेक्षा मनुष्याने देवाला जन्म दिला आहे. कायदा, नियम आणि इतर शक्तीशिवाय मनुष्यावर
कोणत्यातरी गोष्टीची भिती असावी. त्यासाठीच संपूर्णपणे अज्ञात असणा-या आणि
ज्याच्याविषयी सतत गूढ कायम राहील अशी काहीतरी गोष्ट निर्माण करण्यासाठी देव या
संकल्पनेचा उदय झाला असावा, असे
काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. सर्वच धर्मातील देवांना मनुष्याच्या वर्तनावर
कोणत्यातरी शक्तीची सावली असावी, अशा
उद्देशाने निर्माण करण्यात आले असले तरी प्रत्येक धर्मातील देव मनुष्याने आदर्श
जीवन जगण्यासाठी कसे वागावे याबद्दलही सांगतो आणि हाच सर्व धर्मातील समान धागा
आहे.
देळाबाहेरील रांगेत तासन् तास उभे
राहून घेतलेल्या दर्शनापेक्षा एखादा तास जवळच्या वृद्धाश्रमात जाऊन केलेले श्रमदान
तुम्हाला नक्कीच जास्त सुख देईल. अनेकदा देवळातील पेटीत टाकलेले दान देवस्थान
समितीमधील पदाधिकारी देवाचा प्रसाद समजून ‘गट्टम स्वाहा’ करतात. त्यामुळे जर
एखाद्या अनाथालयातील मुलांना गरजेच्या वस्तू खरेदी करून देण्यासाठी हे पैसे वापरले
तर ते जास्त सत्कारणी लागतील. धर्म पालन जरुर करावे, मात्र समाजसेवेच्या माध्यमातून ते झाल्यास लोकांनाही
त्याचा फायदा होईल.
‘देऊळ’ या चित्रपटात दिलीप
प्रभावळकरांच्या तोंडी एक संवाद आहे. ते म्हणतात ‘देव हा सगळीकडे आहे. तो ज्याचा
त्याने शोधावा. काहींना तो देवळात भेटतो, काहींना माणसांत भेटतो तर काहीजणांना तो समाजसेवेत भेटतो’. हदीथ या
विचारवंताचे वाक्य याबाबत अधिक मार्गदर्शक ठरावे. तो म्हणतो ‘पृथ्वीवर जितकी माणसे
आहेत,
ईश्वरापर्यंत पोहचण्याचे
मार्गही तितकेच आहेत.’
मयूर बागुल – अमळनेर
मो. ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment