शाळा
म्हटले म्हणजे शिक्षक, मित्र-मैत्रिणी, खेळ, आभ्यास इत्यादीची सांगड शाळेत रोज
असायची कधी एक एक वर्ग पुढे जात गेलो कधी कळलेच नाही एक छोटे दफ्तर त्यात विषया
नुसार पुस्तक व वही इ. साहित्य असायचे वर्गात नेहमी अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि
खेळाच्या वेळी खेळ असे. बघता बघता दिवस पटकन निघून गेले आणि मग २००९ मध्ये शिक्षणाचा
मुलभूत अधिकार कायदा आला आणि मग काय सर्वाना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाणार
होते पाठ्य पुस्तक शाळेतून मिळणार होती मग राहिले काय फक्त वही तेवढेच पालकान वर
जबाबदारी राहिली होती पण ह्या सर्व परीस्थितीत मुलाच्या दप्तराच्या ओझाचे काय हा प्रश्न
प्रत्येक वेळी उपस्थित होतो शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते तळागाळातील
प्रत्येक व्यक्तीने घेतले पाहिजे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे पण जे
शिक्षण दिलेले जाते आहे त्यातून ज्ञान वाढते आहे पण व्यक्ती म्हणून कुठले कौशल्यात
वाढ होत आहे का? महात्मा गांधीजीनी नई तालीम शिक्षण पद्धत सुरु केली होती पण आज ही
शिक्षण पद्धत कुठे दिसते का शिकवत असताना काही ठिकाण सोडले तर इतर मात्र काय शिकतो
आहे आणि काय नाही काही घेणे देणे नाही त्यात आजून ८ पर्यत नापास करायचे नाही मग
विध्यार्थीचे मूल्यमापन करायचे १ वर्षात एका वर्गात ३५ विद्यार्थी व १ शिक्षक कसे
मूल्यमापन करू शकतो एकी कडे सरकारी मिटिंग, प्रशिक्षण, परीक्षा, कागद पत्रक गोळा
करणे असे काम जर शिक्षकाना करावी लागत असतील तर मग कुठे शिकवण्या कडे लक्ष लागणार
आहे. त्यात खाजगी शाळा चालकांनी शिक्षणाच्या नावाने धंदा सुरु केला त्यात इंग्रजीची
भर या सर्वान मध्ये विद्यार्थीला काय अपेक्षित आहे हे कधी आपण समजून घेणार आज
बाहेरील देशातील शिक्षण पद्धत बघितली तर मुलगा ५ वर्षाचा पूर्ण होत नाही तो पर्यत
त्याला पुस्तकाला हात लावू देत नाही आणि आपल्या कडे ३ वर्ष पासून मुलाला जॉनी जॉनी
एस पाप सुरु होते मुलांची तेवढी बौद्धिक वाढ झालेली असते का त्याला पुस्तक वाचायला
लावणे गोष्टी सांगण्यास लावणे पण आज सरास खाजगी विशेषता इंग्रजी माध्यमातून होताना
दिसते.
आपण
कधी आपल्या शिक्षण पद्धत बदलणार आहोत की नाही फक्त पुस्तकातील धडे बदलून पद्धत
नाही बदलणार तर विद्यार्थीला त्याच्या आवडी नुसार प्रत्येक्षित शिक्षण मिळणे गरजचे
आहे ज्यात प्रयोग पद्धत असेल वही पुस्तक शाळेतच असतील आणि आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा
वापर वाढला असून विविध प्रयोग करणे देखील सुरु आहे त्यातील एक प्रयोग डिजिटल शाळा,
टयबलेट फॉर स्कूल असे अनेक उदाहरण दिसतील पण नुसतेच तंत्रज्ञान वापरून मुलांना
कुठले शिक्षण आपण देणार आहोत हा प्रश्न आहे सर्व जर तंत्रज्ञानाने शिकवायचे म्हणजे
उद्या शिक्षकाने कुठले प्रयोग करून प्रत्येक्षिक शिकवायची यासाठी सरकार ने खाजगी
शाळाची परवानगी देणे बंद केले पाहिजे आणि मंत्री पासून तर अधिकाऱ्यान पर्यत
प्रत्येकाने आपल्या मुलांना सरकारी शाळेत टाकले पाहिजे तर समाजातील सरकारी शाळा
टिकवू शकतील आज जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती बघितली तर शिक्षकाना विद्यार्थी
शोधावे लागत आहे शाळे साठी फार सर्वेक्षण करून विद्यार्थीना विविध सुविधा पुरवून
शाळेत आणण्याचा प्रयत्न केला जातो मध्यन भोजन सारखी आतिशय चांगली योजना तिचा पण
खेळ करून ठेवला आहे लोकांना विश्वास बसेल असे कधी काम कोणी करणार आहे का आज गुजरात
सारख्या राज्यात अक्षर पत्र सारखी संस्था सरकार नापास झाले योजना चालवण्यास म्हणून
संस्थेला ही योजना चालवण्यास आर्थ साह्य करते म्हणजे सरकार स्वता काम करण्यास
नापास होते तेव्हा सामाजिक संस्थाची मदत घ्यावी लागत आहे.
आज
समाजातील किती तरी सरकारी शाळे मध्ये विविध संस्थेचे प्रयोग सुरु आहे त्यात काही
संस्था प्रामाणिक करतात काही स्वताच्या स्वार्थासाठी कार्य दाखवून काम करत आहे म्हणजे
त्यात मला सांगा शिक्षकाने शिकवावे की संस्था चालवनाऱ्यान प्रयोग करू द्याचे मला
वाटते सरकारने शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी हि सामाजिक संस्था आणि सरकार यांच्या
भागिदारीने चालवली पाहिजे आजच्या घडीला आज खूप सामाजिक संस्था चांगल्या पद्धतीने
सरकारी शाळे सोबत अतिशय छान काम करत आहे त्यासाठीच सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा
परिषदेतील सरकारी शाळा ह्या सामाजिक संस्था यांना चालवण्यास देऊन प्रयोग करून
बघावे ५ वर्ष काय परिस्थितीत सुधारणा होतेती आणि यामुळे कदाचित मुलांच्या आवडी
नुसार पाठी वरचे ओझे कमी करून शिक्षण हे कौशल्य पूरक शिक्षणास मदत होईल आणि प्रत्येक
विद्यार्थी हा विविध गुण संपन्न तयार होईल.
मयूर बागुल, अमळनेर
No comments:
Post a Comment