दरी खोऱ्यातून नाद घुमे दे असा काही
अनुभव आपल्या सर्वाना सह्याद्री रंगातील गड किल्ले फिरतांना अनुभवण्यास मिळतो. खरे
तर आपल्या महाराष्ट्राला लाभलेले हे खूप मोठे वरदान आहे की आपल्या कडे निसर्गाने
संपन्न असे सौदर्य सृष्टी आहे. माझा अनुभव गड व किल्ले फिरतांना निसर्ग व त्यातील
सौदर्य सृष्टीचा अभ्यास करणे खरे तर फिरणे हा छंद नसून फिरत असतांना आपण कुठल्या
उद्देशाने फिरण्यासाठी जात आहोत हे खूप महत्वाचे असते. जसे की मज्जा, मस्ती व धमाल
हे सर्व आपण अनुभवतो पण त्याचप्रमाणे ह्या निसर्गा मध्ये खूप काही दडलेले आहे जे
आपण अभ्यासल पाहिजे. मला फिरण्याची आवड आणि निसर्ग अनुभव घेणे त्यात निसर्ग
सौंदर्याने असलेला सह्याद्री त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले
सुंदर हा अनुभव जीवनात नवीन ज्ञान निर्माण करत असते. आपण नुसते एखादे पुस्तक वाचून
माहिती घेऊ शकतो परंतु त्या पुस्तकातील घडलेले प्रसंग आपणस प्रत्यक्ष त्याठिकाणी
गेल्या नंतर अधिक अनुभवण्यास मिळतात. माझ्या दृष्टीने हा अनुभव खूप
मोठा असतो कारण असे म्हंटले जाते की अनुभव हाच आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु
असतो.
मी साधारण मागील काही दिवसान
पूर्वी वासोटा जंगल ट्रेकिंग अनुभव घेण्यासाठी शनिवारी रात्री ११ वाजता निघालो
सातारा मधून कास पठार मार्गाने बामणोली या गावात रात्री ३ वाजता पोहचलो गावातील
प्रमुख देवालयात ट्रेकिंग करण्यासाठी आलेले युवक व युवती
झोपलेले होते. गाव तसे फार मोठे नाही साधरण ३०० ते ४०० लोकसंख्या असलेली वस्ती आणि
उदरनिर्वाहाचे साधन बघितले तर शेती हा मुख्य व्यवसाय त्यानंतर वासोटा फिरण्यासाठी
येणाऱ्या लोकांची सोय करणे. गावात गेल्यागेल्या नंतर खूप शांतता विशेष म्हणजे
शहरातील दग, दगीच्या जीवना पासून सुंदर अश्या निसर्गरम्य वातावरणात किनाऱ्यावर
टेंट लावून निसर्गात झोपण्याचा आनंद तसेच शेकोटी पेटवून एक रात्र थांबून दुसऱ्या दिवशी जंगल सफारीचा अनुभव घेणे. दुसऱ्या दिवसाची पहाट उजडण्या आधी गावातील पशु व पक्षी,
कोंबड्याचा मधुर आवाज आपल्या कानावर पडतो आणि हळूहळू प्रत्येक व्यक्ती उठून तयार
होण्यास सुरुवात करतो. तसे पहिले तर वासोटा हे कोयना धरणाच्या पाठीमागील बॅक वॉटर असलेल्या
ठिकाणी जंगलातून वर जाऊन हा किल्ला आहे. बामणोली ह्या गावापासून साधारण २ तासाचे
अंतर बोटीतून प्रवास करून सह्याद्रीच्या पायथ्याशी पोहचावे लागते. नदीच्या उगमा पासून
कोयना धरण ६४ कि.मी. अंतरावर कोयनानगर (हेळवाक) याठिकाणी आहे. १९६१ मध्ये या
धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आणि या धरणाची लांबी ८०७ मी. व उंची १०३ मी. असून
धरणाला ६ दरवाजे आहे आणि धरणाची क्षमता २७९७ टी. एम. सी. इतकी आहे. कोयना नदीच्या दोन्ही
बाजूस ६०० ते ७०० चौ. कि. मी समृद्धीचे वनक्षेत्र आहे. या धरणाच्या पाण्याची पातळी
साधारण पणे कमाल २१६५ फुट तर किमान ३०० फुट खोली एवढे मोठे क्षेत्र आहे. आपण तेथे
गेल्या नंतर तेथे मोठया प्रमाणत जलाशय बघत असतांना पाण्यातून प्रवास करण्याचा
अनुभव घेण्यास मिळतो.
ह्या यासर्व मध्ये उणीव जाणवली ती
म्हणजे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाची जंगल असल्यामुळे फॉरेस्ट कार्यलय होते पण
पर्यटन स्थळाच्या दृष्टीने देव व मंदिर तयार केली जातात पण निसर्गाच्या सौंदर्य
साठी पैसे नाही का ? असे वाटले. कोयना धरणातून
जाण्यासाठी बोट ते देखील खाजगी आधुनिक सुविधा काहीच नाही. पर्यटक येतात पण त्यांच्या
सोयीसाठी काहीच सुविधा नाही. खरे तर ह्या भागात देखील पर्यटनाच्य दृष्टीने विकास
कार्य करण्यासाठी खूप संधी आहे पण त्याकडे लक्ष दिले जात नाही ही खंत वाटते.
मी वासोटा कडे प्रवास करण्यासाठी
सकाळी संपूर्ण तयारी केली आणि दीड तास बोटीने प्रवास करून वासोटा येथे पोहचलो.
वासोटा हा किल्ला पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्यातील
कैद्यांना ठेवण्याची जागा येथे तयार करण्यात आली होती. सह्याद्रीच्या कुशीत हे
घनदाट जंगल आहे प्रवेश करतांना फॉरेस्ट अधिकारी प्रत्येकांची बॅग तपासून वर सोडत
जंगलात कचरा व प्लॅस्टिक बाटली फेकण्यास बंदी आहे त्यामुळे आपण काय घेऊन जातो आहे
तेथे तपासले जाते आणि मग अनामत रक्कम जमा करावी लागते येताना जर बॅगेतील बाटली कमी
दिसली तर समजा अनामत रक्कम जमा केलेली ती परत दिली जात नाही. वासोटा पर्यत
पोहचण्यासाठी कोयना मधून प्रवास करत अतिशय सुंदर अनुभव येतो चोही बाजूने हिरवे, हिरवे
मोठ मोठे महाकाय वृक्ष बघण्यास मिळते. जंगलात प्राणी असतील परंतु वासोटा मार्गावर
कुठलेच प्राणी दिसत नाही येथील काही वृक्ष हे आपले जीवन संपवून पडलेली दिसतात.
ह्या जंगलातील वृक्ष हे एवढे मोठे आहे की ते
आपल्याला शहरात कुठेही बघण्यास मिळणार नाही सर्वत्र वृक्षाची मुळे पसरलेली दिसतील हा
अनुभव घेत असतांना मनात प्रश्न पडायचं की हे वृक्ष लावले कोणी असतील. आज
महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहे पण नेमके किती नवीन जंगल
तयार होणार ही शंकाच आहे. ह्या जंगलातून
प्रवास करत असतांना मध्ये पाण्याचे झरे बघण्यास मिळतात ह्यातील पाणी थंडगार व
चवदार देखील आहे. वासोटा कडे प्रवास करत
असतांना जंगल सफारीचा अद्भुत अनुभव मिळत असतो जवळपास ३ तास प्रवास करत जंगलातून वर
किल्ल्यावर जावे लागते जात असतांना झरे येतात आणि पाण्याचा झुळू झुळू आवाज येतो या
झाऱ्याचे पाणी हे पिण्यासाठी वापरले जाते, जंगल चढत असतांना मध्ये काहीच मिळत
नाही वर किल्यावर गेले तरी काही विक्रीसाठी नाही त्यामुळे बाहमणोली मधून
जेवण्यासाठी किल्ला वर जेवण घेऊन जावे लागते. हा किल्ला जवळपास ४००० फूट उंच आहे.
तेथे वर पोहचल्या नंतर हुनुमानाचे व महादेवाचे मंदिर दिसतात. किल्यावर कुठलीही
तटबंदी नाही. किल्ला भ्रमंती करत असतांना “बाबू कड” बघण्यास मिळतो आणि तेथून खाली
बघितल्या नंतर खूप मोठी दरी बघण्यास मिळते. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
काळात या किल्ल्यावर कैद्यांना ठेवण्यासाठी जागा करण्यात आली असे त्यातील कैद्यांना
शिक्षा म्हणजे बाबू कड येथून खाली ढकलून देण्यात येई. चोहू बाजूने जंगल आल्यामुळे
कैद्यांला वाचणे शक्य नाही. ह्या जंगलातून खाली खोल दरी आणि जंगलातून चालतांना
वरचढ, नागमोडी रस्ते टोकदार कड आणि कुठलाच
बाजूने धरण्यासाठी सोया नाही तरी किल्ले स्वारी करणे हा ध्यास घेऊन छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या इतिहासाल उजाळा देण्याचा प्रयत्न तरूणाई जोमाने करत असते.
वासोटा किल्ल्यावरून परतीच्या
प्रवास करत असतांना जरा जपवून चालावे लागत होते कारण खाली येत असतांना उतार
असल्याने जरा सांभाळून उतरावे लागते. परतीच्या प्रवासात जंगलातून उतरत असतांना
पक्ष्यांची किलबिल ऐकण्यास मिळते. या जंगलातून फिरत असतांना खूप वेगळा अनुभव मिळत
असतो आणि वादळवाट मधील गाण्यांचे बोल आठवतात.
थोडी सागर निळाई थोडे शंक नि
शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले
वाऱ्यापावसाची गाज काळ भासे गच्च दाट,
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
-
मंगेश कुलकर्णी
जंगलातून खाली येत असतांना ४ वाजे पर्यत
किनाऱ्यावर पोचणे गरजेचे असते. त्यानंतर पुढे पुन्हा दीड तास बोटीने प्रवास करून संध्याकाळाच
सूर्यास्त होण्याआधीचे सूर्य किरणे धरणाच्या पाण्यात बघण्यास मिळतात त्याच प्रमाणे
आकाशात फिरणारा पक्षाचा थवा देखील बघण्यास मिळतो. धरणातून प्रवास संपवून काठावर
जहाज येऊन थांबते आणि पुन्हा गावात आगमन करायचे अश्या प्रकारे वासोटा ट्रॅकिंग पुर्ण होतो.
आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वासोटाला भेट देऊन सह्याद्रीचा अनुभव घ्यावा.
मयूर
बाळकृष्ण बागुल, पुणे
९०९६२१०६६९
#dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
ReplyDeleteThank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!