Sunday, December 30, 2018

जल साक्षरता आणि व्यवस्थापन ही भविष्याची गरज...!



भारतात मूलभूत सोयीसुविधांची मोठय़ा प्रमाणात वानवा आहे. त्यातच पाण्यासारख्या अत्यावश्यक घटकाची येत्या १० वर्षात मोठय़ा प्रमाणात टंचाई भासणार असल्याचे अलीकडे सादर करण्यात आलेल्या भारतीय जल उद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल असा देश आहे. त्यात भारतात सरासरी पावसाचे प्रमाणही चांगले आहे; पण परंतु या पडणा-या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. ते अडवले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले किंवा समुद्राला जाऊन मिळते. त्याचा काहीच फायदा होत नाही. शेतीला पावसाळय़ात मिळणारे पाणी ही जमेची बाब सोडली तर पावसाचा फारसा उपयोग भारतात होत नाही. तो करता येत नाही कारण शेतीसाठी पाऊस हे समीकरण मान्य केले तरी इतर सगळय़ा गोष्टींसाठी पाणी लागते, हे समीकरण लोक मान्य करायला तयार नाहीत. त्यांची तशी मानसिकता बनत नाही, ही भयंकर गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात लोकांचा सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढलेली आहे. सरकार करेल, त्यांनी करावे, अशी मानसिकता आता कालबाहय़ झाली पाहिजे. शेतीसाठी जसे पाणी लागते त्याच प्रकारे घरगुती आणि घराबाहेर उद्योगधंदे तसेच इतर वापरासाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. पण शेतीशिवाय विहिरी, धरणे, कालवे यांच्यात पावसाचे पडणारे पाणी असते. त्या व्यतिरिक्त शहरे आणि ग्रामीण भागांसाठी वर्षभर पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे, ते होत नाही. भारतात जल प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढलेले आहे की, त्यामुळे देशभरातील नद्या, कालवे आणि शहरांच्या मध्यभागी असलेल्या विहिरी आता प्रदूषित झालेल्या आहेत. शहरातील सांडपाणी आणि उद्योगधंद्यातील प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित पाणी यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. पण हे जलप्रदूषण कमी करून जमिनीतील जलपुनर्भरण वाढवणे आवश्यक आहे, ते होत नाही. शेती आणि उद्योगासाठी पाण्याचा बेसुमार उपसा होतो. पण धरणे, विहिरी, कालवे यातील पाण्याचे पुनर्भरण होत नाही. हे वाढवणे आवश्यक आहे. लोकसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि लोकांची मानसिकता लक्षात घेता येत्या काळात भारतीयांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पाण्याचे जमिनीतील पुनर्भरण तसेच पाण्याचा पुनर्वापर तसेच वर्षा जल संचयनाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. पाण्याबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कमी करून जल प्रदूषणाबाबत कठोर कायदा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 
पाण्याचे जीवनातील व्यावहारिक दृष्टीने महत्व समजले की, त्याच्या नियोजनाचे महत्व अपोआप कळते. त्यामुळे प्रत्येक जलसाक्षर व्यक्ती अपोआपच यथाशक्ती पाण्याची काळजी घेईल. देशात आधीच शिक्षणाचे प्रमाण जेमतेम ५०-६० % त्यातही फक्त अक्षर ओळखच असणारे किंवा सहीच येणारे किंवा काम चालाऊच लिहिता वाचता येणारे ज्यास्त आहेत. त्यामुळे जलनियोजनाचे गांभीर्य पाहिजे तसे येत नाही. तथाकथित सुशिक्षित सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी वाया घालवितात. ते जपायचे किंवा सांभाळायचे असते हे त्यांच्या लक्षातच येत नाही. रहिवासी क्षेत्रात म्हणजे ग्रामीण किंवा शहरी वस्ती क्षेत्रात पडणारा पाऊस जमिनीवरून मोठ्या प्रमाणात वाहून जातो. त्याचा पुढे कुठेतरी उपयोग होतोच पण जेथून वाहून जातो तेथील जनता तर वंचितच राहते ना? म्हणून राज्ज्य सरकारांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. जसे- रेन वाटर हार्वेस्टिंग, पाझर तलाव, गाव तळे, शेत तळे, विहीर व तलाव पुनर्भरण, नाला बंडिंग, शेती सपाटी करण, समांतर चर (सी सी टी), वेग वेगळे प्रकारचे छोटे छोटे बंधारे, नाल्यांचे रुंदी व खोलीकरण, कोल्हापुरी बंधारे, भूमिगत बंधारे, चेक बंधारे, वनराई बंधारे, ग्राडोनीज बंधारे, ग्याबियन बंधारे इ. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते, ते अडविले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले, ओढे, समुद्राला जाऊन मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही. शेतीसाठी पाऊस हे समीकरण मान्य केले. तरी इतर सगळ्या गोष्टींसाठी पाणी अतिशय आवश्यक आहे. हे आपण समीकरण मान्य करायला तयार नाहीत, त्यांची त्याप्रमाणे मानसिकता बनत नाही. गेल्या काही वर्षात लोकांचा शासनावर अवलंबून राहण्याच्या मानसिकतेत वाढ झालेली दिसून येत आहे. जे करेल ते शासनाने करावे, अशा मानसिकतेत बदल आणायला हवा. शेतीसाठी जसे पाणी लागते, त्याचप्रमाणे घरगुती आणि घराबाहेर उद्योगधंदे तसेच इतर वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. पण पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी शेतीशिवाय विहिरी, धरणे, कालवे यांच्यात साठले जाते. त्या व्यतिरिक्त शहरे आणि ग्रामीण भागांसाठी वर्षभर पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. भारतात जल प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढलेले आहे की, त्यामुळे नद्या, कालवे आणि शहरांच्या मध्यभागी असलेल्या विहिरी आता प्रदूषित होत आहेत. जलप्रदूषण कमी करून जमिनीतील जलपुनर्भरण वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. शेती आणि उद्योगासाठी पाण्याचा अमर्याद उपसा होतो, तो थांबविला पाहिजे. पण धरणे, विहिरी, कालवे यातील पाण्याचे पुनर्भरण वाढवणे आवश्यक आहे. याबाबत शासन स्तरावरुन विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. गरज आहे ती, प्रत्येकाने योजनांची आपल्या स्तरावर योग्य अंमलबजावणी करवून घेण्याची खरी आवश्यकता आहे. पाण्याचे जमिनीतील पुनर्भरण तसेच पाण्याचा पुनर्वापर तसेच जल संचयनाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. पाण्याबाबत लोकांच्या दृष्टिकोनात बदल घडविणे आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कमी करून जल प्रदूषणाबाबत कठोर कायदा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जल व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शहरी आणि ग्रामीण भागात शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे काम मार्गी लावणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात आपणांस भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपण जर वेळीच यावर उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात पाणीप्रश्न गंभीर बनू शकेल. भविष्यात पाणी प्रश्न अनेक समस्यांना जन्म देणारा ठरणारा आहे, म्हणून जल व्यवस्थापन करताना सर्वच पातळीवर लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. जल साक्षरता आणि त्यातून येणारे जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, याची सर्व स्तरातील नागरिकांनी नोंद घेवून त्याची सुरुवात स्वत:च्या लहान-लहान गोष्टींपासून करुन पाण्याची बचत केल्यास पाणी बचतीची चळवळ उभी राहण्यास वेळ लागणार नाही. त्याकरिता गरज आहे. ती, प्रत्येकाने एकत्रित येऊन पाण्या बाबत विचार विनिमय करुन कृती करण्याची त्याबरोबरच लोकसहभागातून वनसंवर्धन देशातील नैसर्गिक समतोल ठेवून गावस्तरापासून ते जिल्हास्तरावरच नव्हे, तर राज्यस्तरावर याबाबत वृक्ष लागवड, जंगले वाचविणे, जमिनीची धुप थांबविणे, सर्व शेतकऱ्यांनी बांधावरच पाणी अडविणे याबाबत आपण सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. वनसंपदेचे संवर्धन केल्यास आपण दुष्काळाकडून जलसमृद्धीकडे जाऊ शकतो. कारण विपूल वनसंपदा असेल, तरच पर्जन्यमानही चांगले होऊन जलसंपत्ती वाढेल.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६ 

Monday, December 10, 2018

मतदान आणि लोकशाही : नागरिकांची भूमिका

 भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ. स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली (१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.

 स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनुभव घेतला आहे. आज कोणतीही निवडणूक म्हटली, की स्पर्धा आली. स्पर्धा आली की "तू की मी' ही चढाओढ आली. तशी चढाओढ सुरू झाली, की त्या पाठोपाठ आरोप- प्रत्यारोप आलेच. काही खरे- काही खोटे. कोणते खरे आणि कोणते खोटे हे नागरिकांनी आपापल्या माहितीप्रमाणेच, इतकेच नव्हेतर आपापल्या आवडीनिवडी, इच्छेप्रमाणे ठरवायचे. हा मानवी स्वभाव आहे.  त्या- त्या शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिःसारण, प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधा यांच्या व्यवस्थेत पक्षीय राजकारण नसावेच. मतभेद वेगळा आणि मारामारी वेगळी. त्या मतभेदांचे निराकरण आपसांत चर्चेने व्हावे. पण ही सारी तात्त्विक संकल्पना. प्रत्यक्षात अनेक प्रकाराचे स्वार्थ गुंतलेले असतात. नगरविकास योजना कायद्याचाही उपयोग नगरविकासाच्या नावाने आपल्या विरोधकांच्या मिळकतींवर आरक्षणे टाकण्यासाठी सर्वत्र केला जातो. पालिकाच नव्हे तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असतो. हे बदलले पाहिजे. त्यासाठी सर्वसाधारण मतदानाचे विचार बदलले पाहिजेत. अधिकारापेक्षा जबाबदारी, कर्तव्य, दायित्व यांच्यावर भर दिला पाहिजे, ही भावना वाढली पाहिजे. आज चित्र भेसूर दिसते आहे. पण तो स्थित्यंतराचा एक टप्पा आहे. हे चित्र नक्कीच बदलेल आणि त्याची सुरवात या आपल्या भारतातून होईल. हा माझा विश्वास, समाजाच्या अनुभवातून अभ्यासातून आलेला आहे.

दादागिरी अन्निवडणुका हे समीकरण नवीन नाही. जे सुशिक्षित लोक आहे ते देखील मागे नाही हे चित्र सर्वान समोर घडतांना देखील नागरिक मुग गिळून शांत कसे बसू शकतात. आजही हेच सारे विचार, हे सारे प्रश् आहेतच. त्यात भर पडली आहे ती फक् एका प्रकाराची. ती म्हणजे बाहुबलाची. मसल पॉवरची, दादागिरीच्या सक्तीची. गेली अनेक वर्ष दादागिरी संबंधीचे आरोप होतच होते. आता त्या आरोपांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे आणि आता, "असुदे रे तो कसाही, आपली कामे करेल ना, झाले तर! उलट तसा असेल तर आपली कामे लवकर होतील, जास्त होतील.' असाही दृष्टिकोन स्वीकारला जातो. मतांसाठी दमदाटी, पैशांचा भ्रष्टाचार, हे प्रकार तर मतांवर आधारलेली लोकशाही सुरू झाली.

जातीच्या या विळख्याचं एक लोकप्रिय विश्लेषण प्रचलित आहे. निवडणुकीच्या राजकारणाने जातीयवाद बोकाळला असं मानण्याचा एक प्रघात आहे. आता हे तर खरंच आहे, की भारतातल्या निवडणुकांमध्ये विविध प्रकारे जात हा घटक कार्यरत असतो. पण समाजात आधीच प्रचलित असणारे अंतराय स्पर्धात्मक राजकारणात जास्त प्रखरपणे प्रकट होतील, वापरले जातील, हे तर अगदी स्वाभाविक आहे. भोवताली जात नावाचे वास्तव समाजात चिरफळ्या पाडत असताना राजकीय स्पर्धा मात्र त्यापासून सोवळी राहील ही अपेक्षा दुधखुळेपणाची आहे. अर्थात अशा विखंडित समाजात जातीच्या चिरफळ्या पार करून त्यापेक्षा मोठे राजकारण करणारे पक्ष आणि नेते फारसे उभे राहिले नाहीत, हे खरेच आहे. पण राजकारणाने जात मोठी केली, नाहीतर ती मागे पडली असती, ही समजूत मात्र बरोबर नाही. आणि जाता जाता समाजातील अंतरायांकडे पार दुर्लक्ष करून विशुद्ध अशा सामाजिक हिताचा पाठपुरावा करणं ही बाब निव्वळ कल्पनारम्य आहे. राजकारण किंवा धोरणनिर्मिती या प्रक्रिया अशा अमूर्त आणि केवळ तर्कावर चालणाऱ्या नसतात.

            आज एकंदरीत बघितले तर छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानणारे महाराष्ट्रातील जनता ज्या राजकीय व्यक्तीने त्यांच्या बद्दल चुकीचे बोलले त्याला निवडून देते हे कसे शक्य होऊ शकते, महाराजांच्या पैक्षा मतदारांना पैश्याची भुरळ पडली हे मान्य करायला पाहिजे. सत्य हे मान्य करणे कठीण असते परंतु लक्षात ठेवले पाहिजे. सध्या ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहे ती लोकशाहीला घातक आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचार ही अतिशय गंभीर आणि अराजकतेकडे नेणारी सामाजिक समस्या बनली आहे. निवडणूक आयोग निवडणुकीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या ताकदीपेक्षा हे काम भयंकर कठिण आहे. आता मतदारांनीच निवडणुकीतील भ्रष्टाचार आणि लाचखोरी रोखण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची निकड आहे. मतदारांना लाच देण्याबरोबर, पेड न्यूज, सरकारी यंत्रणेचा वापर, जाती, भाषा, प्रांत यामध्ये विद्वेष निर्माण करणे, गुंडगिरी हा सर्व निवडणुकीतील भ्रष्टाचार आहे.


मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
भ्रमणध्वनी९०९६२१०६६९